1 Gram Gold Ring Design For Women: सोन्याची अंगठी खरेदी करायची म्हणल की आपल्या डोळ्यांसमोर नेहमी जड, भरगच्च किंवा पारंपरिक अंगठ्या येतात. पण कॉलेजला जाणाऱ्या तरुणी असोत किंवा ऑफिसला जाणाऱ्या महिला, सध्या प्रत्येकीलाच रोजच्या वापरासाठी (Daily Wear) बोटात अडकणार नाही, कपड्यांमध्ये खेचली जाणार नाही आणि दिसायला अतिशय नाजूक व सुंदर वाटेल अशी हलकी अंगठी हवी असते.
- १. लीफ विथ गोल्डन बीड रिंग (Leaf with Gold Bead Ring)
- २. मॉडर्न ओपन हार्ट डिझाईन (Modern Open Heart Ring)
- ३. ट्रिपल हार्ट स्लीक रिंग (Triple Heart Sleek Ring)
- ४. थ्री-स्टोन पॅरलल बँड रिंग (Three-Stone Parallel Band Ring)
- ५. वेव्ह विथ थ्री-स्टोन एक्सेंट (Wave with 3-Stone Ring)
- ६. मिनिमल लीफ ट्विस्ट रिंग (Minimal Leaf Twist Ring)
- ७. स्क्वेअर क्लस्टर स्प्लिट रिंग (Square Cluster Split Ring)
- ८. क्लासिक इन्फिनिटी बँड रिंग (Classic Infinity Band Ring)
- १ ग्रॅमची सोन्याची अंगठी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा:
बाजारात सोन्याचे भाव वाढत असताना १ ग्रॅमच्या आसपासच्या हलक्या वजनातील गोल्ड रिंग्स (Lightweight Gold Rings) हा अतिशय बजेट-फ्रेंडली आणि स्टायलिश पर्याय आहे. जर तुम्हालाही स्वतःसाठी किंवा गिफ्ट देण्यासाठी अशी मिनिमल, सुंदर आणि बजेट फ्रेंडली अंगठी हवी असेल, तर खालील ८ ट्रेंडी डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील.
१. लीफ विथ गोल्डन बीड रिंग (Leaf with Gold Bead Ring)

या अंगठीमध्ये दोन बारीक सोन्याच्या रेषा पानासारख्या आकारात एकत्र येतात आणि त्या मध्यभागी एक छोटासा नाजूक सोन्याचा मणी (Bead) बसवला आहे. पानाच्या एका पाकळीवर दिलेले मॅट फिनिशिंग आणि दुसऱ्या बाजूची ग्लॉसी चमक यामुळे ही अंगठी दिसायला अतिशय आधुनिक वाटते. रोजच्या ऑफिस वेअरसाठी ही एक क्लासिक चॉईस आहे.
२. मॉडर्न ओपन हार्ट डिझाईन (Modern Open Heart Ring)

हार्ट शेप हा प्रत्येक तरुणीचा आवडता प्रकार. या डिझाईनमध्ये जाड सोन्याचा वापर न करता ‘V’ आकाराच्या बेसवर दोन नाजूक वळणांमधून ओपन हार्ट तयार केला आहे. एका पाकळीवर हलके टेक्सचर असल्याने अंगठीला प्लेन लुक न येता छान लुक येतो. वेस्टर्न कपड्यांवर किंवा कुर्तीवर ही रिंग बोटात खूप खुलून दिसते.
३. ट्रिपल हार्ट स्लीक रिंग (Triple Heart Sleek Ring)

मध्यभागी एक छोटा भरिव हार्ट आणि दोन्ही बाजूंना त्याला जोडलेले दोन ओपन हार्ट्स अशी ही अतिशय क्युट रचना आहे. अंगठीचा बँड अगदी नाजूक आणि गोलाकार ठेवल्यामुळे बोटात अंगठी घातल्याचे जाणवतही नाही. रोजच्या घरकामात किंवा कॉलेजमध्ये घालण्यासाठी ही डिझाईन रोजच्या वापरासाठी विचारात घेता येऊ शकते.
४. थ्री-स्टोन पॅरलल बँड रिंग (Three-Stone Parallel Band Ring)

दागिन्यांमध्ये थोडी चमक हवी असणाऱ्यांसाठी ही अंगठी एक नंबर पर्याय आहे. अंगठीच्या पुढील बाजूस सोन्याची दुहेरी पट्टी (Split Band) करून मध्यभागी तीन छोटे अमेरिकन डायमंड्स किंवा झिरकॉन स्टोन्स एका सरळ रेषेत बसवले आहेत. साडी किंवा फॉर्मल कपड्यांवर हातात ही अंगठी अगदी सोबर आणि रिच लुक देते.
५. वेव्ह विथ थ्री-स्टोन एक्सेंट (Wave with 3-Stone Ring)

पाण्याच्या लाटेसारखी (Wave) वळणदार सोन्याची नक्षी आणि बाजूला तीन बारीक पांढरे खडे अशी ही अंगठी पाहताक्षणी लक्ष वेधून घेते. मध्यभागी थोडी मोकळी जागा ठेवल्यामुळे कमी सोन्यातही डिझाईन बोटावर पसरट आणि उठून दिसते.
६. मिनिमल लीफ ट्विस्ट रिंग (Minimal Leaf Twist Ring)

पानाच्या नाजूक पाकळीसारखी वळलेली ही डिझाईन अतिशय साधी पण ट्रेंडी आहे. एका बाजूला पानाची नक्षी आणि दुसऱ्या टोकाला बारीक तीन स्टोन्सची जोड यामुळे या अंगठीला सिमेट्रिकल लुक न येता थोडा इंडो-वेस्टर्न फील येतो. कमी वजनात हटके काहीतरी शोधणाऱ्यांसाठी हे डिझाईन एक पर्याय ठरू शकते.
७. स्क्वेअर क्लस्टर स्प्लिट रिंग (Square Cluster Split Ring)
जर तुम्हाला चौकोनी किंवा भौमितिक (Geometric) आकार आवडत असतील, तर तुम्हाला हा प्रकार नक्की आवडेल. अंगठीचा पुढचा भाग दोन भागात विभागून मध्यभागी चार बारीक खड्यांचा मिळून एक छोटा चौकोन तयार केला आहे. ही अंगठी बोटात घातल्यावर हात खूप सुंदर दिसतो.

८. क्लासिक इन्फिनिटी बँड रिंग (Classic Infinity Band Ring)
इन्फिनिटी (अथांग प्रेम किंवा मैत्रीचे प्रतीक) ही सध्याची सर्वात लोकप्रिय थीम आहे. यात कोणताही खडा किंवा भरगच्च काम नसून केवळ सोन्याच्या बारीक तारेमधून इन्फिनिटी चिन्ह तयार केले आहे. प्लेन गोल्ड असल्याने खडे पडण्याची भीती नसते आणि रोजच्या वापरासाठी ही अंगठी वर्षानुवर्षे उत्तम टिकते.

१ ग्रॅमची सोन्याची अंगठी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा:
- वजन आणि टिकाऊपणा: १ ग्रॅम किंवा १.५ ग्रॅमच्या आसपासच्या अंगठ्या नाजूक असतात. त्यामुळे डिझाईन निवडताना तिचा मागचा बँड खूप जास्त पातळ नसावा, अन्यथा अंगठी वाकण्याची शक्यता असते.
- हॉलमार्किंग: अंगठी खरेदी करताना ती हॉलमार्क केलेली आहे का, BIS चिन्ह आणि HUID क्रमांकाची माहिती आहे का, हे सराफाकडून तपासा. बिलावर सोन्याची शुद्धता आणि वजनाची माहितीही तपासा.
- खड्यांचे वजन: स्टोन असलेल्या अंगठीत बिलावर सोन्याचे निव्वळ वजन (net gold weight), स्टोनचे वजन आणि making charges यांची माहिती स्पष्टपणे दिली आहे का, हे तपासा.
हेही वाचा: सोन्याच्या दरात किंचित दिलासा! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील आजचे २४K आणि २२K सोन्याचे दर जाणून घ्या.
टीप: लेखात दाखवलेली डिझाईन्स ही illustrative design concepts आहेत. प्रत्यक्ष अंगठी तयार करताना तुमच्या बोटाचा आकार, अंगठीचा आकार, बँडची जाडी, सोन्याची शुद्धता आणि स्टोन सेटिंगनुसार अंतिम वजन व डिझाईनमध्ये थोडाफार फरक पडू शकतो. फोटो स्थानिक सराफ किंवा ज्वेलरी डिझायनरला दाखवून 1 ग्रॅम, 1.25 ग्रॅम किंवा तुम्ही तुमच्या बजेटनुसार अंगठी तयार करून येऊ शकता.

