Gold Price Prediction 2027: २०२७ मध्ये सोन्याचा दर किती असेल? तज्ज्ञांचा मोठा अंदाज, जाणून घ्या

By Rohan Miraje - Founder & Editor
5 Min Read
Gold Price Prediction 2027

Gold Price Prediction 2027: सध्या सराफा बाजारात एकच चर्चा रंगली आहे—सोन्याचे दर आणखी वाढणार की सोन स्वस्त होणार? गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दराने घेतलेली उसळी आणि त्यानंतर सोन्याच्या दरात आलेली नरमाई यामुळे सामान्य खरेदीदारांपासून ते गुंतवणूकदारांपर्यंत प्रत्येक जण संभ्रमात आहे. ऑगस्टमध्ये प्रचंड तेजी दाखवणाऱ्या सोन्याला सप्टेंबरमध्ये किंचित ब्रेक लागला. अशा स्थितीत पुढील वर्ष-दोन वर्षांत, म्हणजेच २०२६ अखेर आणि २०२७ मध्ये सोन्याचा भाव नक्की कुठे जाऊन पोहोचेल?

यावर जगातील नामांकित वित्तीय संस्था JPMorgan आणि बाजारातील बड्या विश्लेषकांनी अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहेत.

२०२६ आणि २०२७ मध्ये सोन्याचा दर किती होऊ शकतो? (JPMorgan Report)

JPMorgan Global Research च्या ताज्या अहवालानुसार, आगामी काळात सोन्यामध्ये पुन्हा मोठी तेजी पाहायला मिळू शकते:

  • २०२६ ची अखेर (चौथी तिमाही): सोन्याचा दर सरासरी ६,००० डॉलर प्रति औंस राहण्याचा अंदाज आहे.
  • २०२७ ची पहिली तिमाही: भाव वाढून सुमारे ६,२०० डॉलर प्रति औंस पर्यंत जाऊ शकतात.
  • २०२७ ची दुसरी तिमाही: सरासरी भाव ६,२५० डॉलर राहू शकतो.
  • २०२७ ची तिसरी व चौथी तिमाही: सोन्याचा आंतरराष्ट्रीय भाव ६,३०० डॉलर प्रति औंस चा टप्पा गाठू शकतो.

या आकडेवारीनुसार, २०२७ या संपूर्ण वर्षात सोन्याची सरासरी किंमत सुमारे ६,२६३ डॉलर प्रति औंस राहण्याची दाट शक्यता JPMorgan ने वर्तवली आहे. 

$6,263 प्रति औंस म्हणजेच ₹2.25 लाख प्रति तोळा. महत्त्वाचे: (हा भारतातील सोन्याच्या दुकानातील सोन्याचा प्रत्यक्ष दर नाही. यात GST, आयात शुल्क, स्थानिक प्रीमियम, मेकिंग चार्ज इत्यादी समाविष्ट नाहीत). हे सर्व आकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील (औंसनुसार) आहेत. भारतात सोन्याचे प्रत्यक्ष दर ठरताना केवळ डॉलरचा भाव नाही, तर अमेरिकन डॉलर विरुद्ध भारतीय रुपयाचे मूल्य, आयात शुल्क (Import Duty), जीएसटी आणि स्थानिक पेढ्यांमधील मागणी या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होतो.

पाहायला विसरू नका: महिलांसाठी 1 ग्रॅमच्या आसपासच्या सोन्याच्या अंगठ्यांचे 8 सुंदर डिझाईन्स.

ऑगस्टमध्ये सोन्यात मोठी उसळी आणि सप्टेंबरमध्ये नरमाई का आली?

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (WGC) अधिकृत आकडेवारीनुसार:

ऑगस्ट महिना: आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सुमारे १३ टक्क्यांनी वधारले, तर भारतात त्याचे भाव जवळपास १२ टक्क्यांनी वाढले.

सप्टेंबर महिना: बाजाराने अचानक वळण घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ३.९ टक्के आणि भारतात जवळपास ४.६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.

या चढ-उताराचे मुख्य कारण काय?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या (Federal Reserve) व्याजदर धोरणाबाबत बाजारात निर्माण झालेला संभ्रम आणि गोल्ड ईटीएफ (Gold ETF) मधील गुंतवणुकीत झालेली किंचित घट यांमुळे सप्टेंबरमध्ये ही नरमाई दिसून आली.

सोन्याचा भाव भविष्यात १०,००० डॉलरपर्यंत जाऊ शकतो?

JPMorgan च्या ६,३०० डॉलरच्या अंदाजापेक्षाही मोठा आणि धक्कादायक अंदाज प्रसिद्ध ब्रोकरेज संस्था Jefferies चे ग्लोबल इक्विटी स्ट्रॅटेजिस्ट ख्रिस वूड (Chris Wood) यांनी मांडला आहे.

त्यांच्या मते, भविष्यात सोन्याचा भाव १०,००० डॉलर प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो. जर अमेरिकेने आपल्या बाँड यिल्ड्सवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकन डॉलरवर मोठा दबाव येईल आणि अशा स्थितीत गुंतवणूकदारांचा सोन्याकडे ओढा वाढून भावात अभूतपूर्व तेजी येऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे. 

भविष्यातील सोन्याच्या दरावर कोणते घटक प्रभाव टाकणार?

सोने स्वस्त होणार की महाग, हे ठरवणारे ३ प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत:

मध्यवर्ती बँकांची (Central Banks) खरेदी: गेल्या काही वर्षांत जगभरातील मध्यवर्ती बँकांनी प्रचंड सोन्याचा साठा केला आहे. २०२६ मध्ये अधिकृत आकडेवारीत ही खरेदी मंदावलेली दिसत असली, तरी जागतिक पातळीवर अनधिकृत किंवा पर्यायी माध्यमांतून बँकांची खरेदी अजूनही सुरू असण्याची शक्यता WGC ने व्यक्त केली आहे.

अमेरिकन डॉलर आणि व्याजदर: फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत घेतलेले निर्णय आणि डॉलरची मजबूती सोन्याच्या किमतीवर थेट परिणाम करते.

जागतिक आर्थिक व राजकीय अस्थिरता: महागाई, सरकारी कर्जाचा वाढता बोजा आणि देशांमधील भू-राजकीय तणाव वाढल्यास सोन्याला सर्वात ‘सुरक्षित गुंतवणूक’ (Safe Haven) मानले जाते, ज्यामुळे मागणी वेगाने वाढते.

ग्राहकांनी आणि वाचकांनी काय लक्षात ठेवावे?

सध्या ६,००० डॉलर, ६,३०० डॉलर आणि १०,००० डॉलर यांसारखे मोठे आकडे चर्चेत असले, तरी हे वित्तीय संस्थांचे अंदाज आहेत. भविष्यात आंतरराष्ट्रीय घडामोडींनुसार दरांमध्ये कधीही मोठे बदल होऊ शकतात.

त्यामुळे जर तुम्ही लग्नकार्य, सण किंवा वैयक्तिक वापरासाठी सोन्याचे दागिने खरेदी करत असाल, तर भविष्यातील अंदाजांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष खरेदीच्या दिवशीचा स्थानिक सराफ बाजारातील अधिकृत भाव, २२ कॅरेट व २४ कॅरेटमधील फरक, BIS 916 Hallmark, HUID कोड आणि मेकिंग चार्जेस तपासूनच व्यवहार करावा.

अस्वीकरण (Disclaimer): या लेखात नमूद केलेले भविष्यातील किमतींचे आकडे हे आंतरराष्ट्रीय वित्तीय विश्लेषक आणि संस्थांचे अंदाज आहेत. याला थेट आर्थिक किंवा गुंतवणुकीचा सल्ला मानू नये. दागिने खरेदी किंवा गुंतवणुकीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक अधिकृत सराफांकडून दरांची खात्री करून घ्यावी.

Share This Article
फॉलो करा